कमी वयात केस पांढरे होत आहेत? या आहेत खास टिप्स तुमच्यासाठी

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या आज सर्वसामान्य झाली आहे. आम्ही काही घरगुती उपाय सुचवत आहोत ज्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात.
• काळी मिरी घेऊन त्याची पावडर तयार करा, यासाठी काळ्या मिरीचे काही दाणे पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळासाठी उकळवत ठेवा, केस धुताना या पाण्याने केस धुवा. एक ते दोन महिन्यांसाठी हा उपाय ट्राय करा.
• कढिपत्त्याची पानं फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत. तर यामुळे केसांच्या अनेक समस्यांवरही उपाय करणं शक्य होतं. पांढया केसांची समस्या दूर करण्यासाठी पाण्यामध्ये कतिपत्त्याची पानं उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ करा. तसेच तम्ही कढिपत्याच्या पानाचा रस काढून तो खोबऱ्याच्या तेलामध्ये एकत्र करून केसांना लाव शकता.
• कोरफड फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही फायदेशीर ठरते. कोरफडीचा गर काढून केसांना लावल्याने केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत होते.याचा सतत वापर केल्याने केस तुटण्याची समस्या कमी होते. कोरफडीच्या जेलमध्ये लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्याने केस काळे आणि चमकदार होतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा