पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर कामशेत शहराजवळ बौर गावाच्या हद्दीत कंटेनर व खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला आहे.
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर बौर गावच्या जवळ आज सकाळी ५ च्या सुमारास चेन्नईकडून भिवंडीच्या दिशेने जाणारा कंटेनर रस्त्यात अचानक बंद पडला होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या लक्झरी बसने कंटेनरला जोरदार धडक दिली.
या अपघातात बस चालक रमेश कबाडे (वय २४ रा. म्हाडा, सोलापूर) यांचा मृत्यू झाला. तर बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. जखमीवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.