नवी दिल्ली: सध्या कांद्याचे दर कमी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना सध्या तरी दिलासा मिळणार नाही सरकारच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात ठिकाणी कांदा २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात कांद्याचे दर खाली येण्याची अपेक्षा आहे.
सध्या नाशिकमध्ये देशातील सर्वात कमी दराने कांदा विकला जात आहे. इथल्या कांद्याची किंमत प्रतिकिलो ७५ रुपये आहे. इतर राज्यात कांद्याला १०० रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. देशातील आयात केलेला कांदा २० जानेवारीपर्यंत येईल, असा सरकारचा विश्वास आहे.
२० जानेवारीपर्यंत कांद्याची पहिली खेप भारतात येणार असल्याची माहिती आहे. लोकांप्रमाणेच सरकारही या कांद्याच्या पहिल्या शिपमेंटची वाट पहात आहे. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता सरकारने १.२ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.