कांदा, पेट्रोलनंतर आता दूधही महागले

मुंबई : इंधन व कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. राज्यात आजपासून (दि.१६) गायीचे दूध लिटरमागे २ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गायीच्या दुधासाठी ४४ ऐवजी ४६ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहे.
‘अमूल’ने आपल्या दुधाच्या दरामध्ये विविध राज्यात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली, तर मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगलामध्ये ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा