कांद्याची वाटचाल दहा हजारांकडे

27

पुणे: दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या लाल कांद्याचे पीक उद्ध्वस्त केले. नाशिक, सोलापूर सह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात मधील लाल कांदा पावसामुळे सडला, शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला उन्हाळ कांदा अखेर इकडे पोचल्याने नीचांकी आवक नोंदवली आहे. उशिराने लागवड झालेला पोळ कांदा बाजारात येण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या शिल्लक उन्हाळी कांद्यावर मदार असेल येत्या पंधरवड्यात कांद्याचा क्विंटलचा दर दहा हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
अवकाळी पावसाचा राज्यातील इतर पिकांवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पालेभाज्या कांदा, सोयाबीन यांसारखे अनेक पिकांची नासाडी झाल्यामुळे येत्या काळात सर्व वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा