संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा कंगनाचा आरोप…

मुंबई, ३ सप्टेंबर २०२०: सुशांत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस तसेच ठाकरे सरकारवर अनेक जणांकडून टीका करण्यात आल्या. विरोधी पक्षांना पासून ते सेलिब्रेटिंग पर्यंत सर्वांनीच सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री कंगना राणौत हिने देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधत अनेक ट्विट केले होते. बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनानं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे.

पोलिसांची भीती वाटत आहे, या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचं तिनं म्हटलं आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केलं होतं.

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण

कंगनानं याआधी मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. ‘कंगना राणौत गेल्या १०० तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. तिला पोलीस सुरक्षेची गरज आहे. पण महाराष्ट्र सरकार ते पुरवत नाही,’ असं ट्विट भाजप आमदार राम कदम यांनी केलं होतं. यावर कंगनानं मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे राम कदम यांनी कंगनाच्या मताचं समर्थनही केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा