गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई कंगना राणावत निघाली मुंबईला ; प्रवास सुरू करण्याआधी म्हणाली…

कंगना राणावत निघाली मुंबईला ; प्रवास सुरू करण्याआधी म्हणाली…

मुंबई :९ सप्टेंबर ,२०२०

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वी ट्विट करून ” ९ सप्टेंबर ला मी मुंबईत येत आहे कोणाच्या बापात हिम्मत असेल तर रोखून दाखवा. असे वादग्रस्त आणि आव्हान देणारे ट्विट केले होते. दिलेल्या आव्हान नुसार ती मुंबईच्या दिशेने निघाली आहे. प्रवासाला निघण्याआधी एक ट्विट करत, ना झुकणार, ना घाबरणार ,अशी भूमिका घेत कंगना राणावत मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.

राणी लक्ष्मीबाई यांच्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाला मी चित्रपटातून जगले आहे. मात्र, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जात आहे. मी राणी लक्ष्मीबाई यांच्या पावलावर पाऊल टाकून घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात नेहमी खुलेपणाने विरोध करेल. जय महाराष्ट्र, जय शिवाजी, असं ट्विट कंगणाने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला इशारा दिला होता. त्यामुळे कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, कंगना मुंबईत आल्यावर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कंगणा मुंबईत दाखल झाल्यावर काय घडतं? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version