गोल पोस्ट गुन्हा कानिफनाथ गडावर एकाची आत्महत्या

कानिफनाथ गडावर एकाची आत्महत्या

अहमदनगर : पाथर्डीतील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिराच्या गडावरून एका युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शिवहरी एकनाथ सुरकुटे (वय २४) हा वाशिम जिल्ह्यातील घोणसरवाडी येथील युवक असून पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानिफनाथ गडावर झोपण्यासाठी जागा आहे का? असे आईला सांगून शिवहरी गडावर गेला होता. त्यानंतर शिवहरीने मंदिराच्या पूर्व बाजूच्या भिंतीवरून उडी मारल्याचे लक्षात आले.
याबाबत मयत शिवहरी सुरकुटे याची आई आसराबाई सुरकुटे यांनी पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी नोंद घेतली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version