इंदापूर, ९ ऑक्टोबर २०२०: सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन नायक कांशीराम यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे मत माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कांशीराम यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त संत रोहिदास समाज मंदिरात त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, नानासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक हरिदास हराळे, स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या प.महाराष्ट्राचे संघटक कृष्णा हराळे, राजू गुळीग, चंद्रकांत सोनवणे, रोहित ढावरे, खंडू मखरे, विजय भंडलकर, बाळासाहेब चव्हाण,संदीप मंडले, सोमा चव्हाण, सुहास मखरे, धर्मेंद्र लांडगे आदि मान्यवरांच्या हस्ते कांशीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहिली.
माजी नगराध्यक्ष ननवरे म्हणाले की, वास्तवातील भारत व स्वप्नरंजनातील इंडिया यातील द्वंद्व तरुण पिढीमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी, भारताला सशक्त बनवण्यासाठी कांशीराम यांच्यासारखी व्यक्तिमत्वे मार्गदर्शक ठरणार आहेत. प्रा. अशोक मखरे म्हणाले की, कांशीराम यांना सामाजिक ऐक्य अपेक्षित होते. समाजाविषयी नकारात्मक विचार बाजूला ठेवल्याशिवाय सामाजिक ऐक्य अशक्य आहे. हे लक्षात घेवून त्या दृष्टीने सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सन १९९२ शिक्षणासाठी पुण्यात असताना कांशीराम व माजी मुख्यमंत्री मायावती यांना प्रत्यक्ष भेटण्याचा पदस्पर्श करण्याचा योग आला. सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्याचे बाळकडू त्या निमित्ताने मिळाले अशी आठवण ही प्रा.मखरे यांनी सांगितली.
न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे.