नवी दिल्ली, २८ जानेवारी २०२३ : दिल्लीतील केशवपुरम भागातही कंझावाला घटनेसारखीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत असणाऱ्या भरधाव कारचालकाने एका दुचाकीस्वारास जोरदार धडकली, यामुळे घडलेला अपघात एवढा भीषण होता की कारची धडक बसताच दुचाकीस्वार आणि त्याचा सहकारी दोघेही हवेत उडाले. त्यापैकी एक जण कारच्या छतावर आदळून रस्त्यावर पडला, तर दुसरा बोनेटवरच अडकला आणि त्यांची दुचाकी (स्कुटी) ही कारमध्ये फसली होती. भरधाव वेगातील कार मात्र थांबली नाही, ती त्या दोघांना जळपास साडेतीनशे मीटर फरपटत नेले. यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
या भयानक घटनेची माहिती मिळताच त्या भागात गस्तीवर असणाऱ्या केशवपुरम पोलिसांनी आणि पीसीआर व्हॅन पोलिसांनी कार चालकासह पाच जणांना अटक केली. अपघातीतील गंभीर जखमींनी रुग्णालयात दाखल केले मात्र, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, उपचारादरम्यान दुसर्या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातमधील मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.
अपघातमध्ये मृत्यू झालेल्याचे नाव कैलाश भटनागर आणि गंभीर जखमी असलेल्याचे सुमीत खारी असल्याचे समोर आले आहे. तर, चौकशी असे समोर आले आहे की या घटनेतील सर्व आरोपी हे विद्यार्थी असून ते एका विवाहसमारंभातून घरी निघाले होते आणि नशेमध्ये होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.