कपिल देव यांनी ट्विट करत चाहत्यांचे मानले आभार, प्रकृतीत सुधार

नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर २०२०: २२ तारखेला भारतीय संघाचे माजी कर्णधार तसेच पहिला विश्‍वकरंडक मिळवून देणारे कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री उशिरा एक वाजण्याच्या दरम्यान त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं होतं. तसेच येत्या काही दिवसात त्यांना घरी देखील सोडण्यात येईल असे देखील सांगितलं होतं.

आपल्या प्रकृतीत झालेला सुधार पाहत कपिल देव यांनी चाहत्यांसाठी एक ट्विट केलं आहे. आपल्याला बरं वाटत असल्यचे त्यांनी ट्विट करून चाहत्यांचे आभार देखील मानले. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यावाद. तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं.

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या ओखला येथील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा १ वाजता भरती करण्यात आलं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयाच्या अधिकृत माहितीनुसार, कपिल देव यांना सध्या अतिदक्षता विभागात डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधार होत असून काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा