मुंबई: कपिल शर्मा यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. कपिल शर्मा वडील झाले आहेत. त्यांची पत्नी गिन्नी चतरथ यांनी मुलीला जन्म दिला. कपिल शर्मा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्याने ट्वीट केले की ते वडील झाले आहेत. त्याच्या घरात मुलगी जन्मली आहे.
कपिलने ट्वीट केले आणि लिहिले की, मुलगी मिळाल्याबद्दल धन्य आहे, आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आहे, लव्ह यू ऑल जय माता दी. कपिलच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अभिनंदनाची लाट आली. गुरु रंधावा, रकुल प्रीत सारख्या कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले.
कपिल शर्माने गेल्या वर्षी १२ डिसेंबर २०१८ गिन्नी चतरथशी लग्न केले होते. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा होती.