कर्जतमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

कर्जत, दि. २६ जुलै २०२०: कर्जत मध्ये  आजी – माजी सैनिक संघटनेच्या वतीने युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कारगिल (जम्मू आणि काश्मिर) मध्ये १९९९ साली भारत – पाकिस्तान दरम्यान लढल्या गेलेल्या युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने धूळ चारत २६ जुलै १९९९ रोजी कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकवला. तेव्हापासून २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. कारगिल युद्ध ८ मे १९९९ रोजी सुरू होऊन २६ जुलै १९९९ पर्यंत चालले त्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम, शौर्य आणि देशाप्रतीअसलेल्या समर्पणाची भावना ठेवून मोठ्या जिद्दीने युद्ध जिंकले होते. 

आज दि.  २६ जुलै रोजी कर्जतमध्ये युद्ध स्मारक येथे माजी सैनिक संघटना – कर्जत तालुका यांच्या वतीने कारगिल युद्धामध्ये प्राणांची आहुती दिलेल्या शूर पराक्रमी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहुन कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी कर्जत आजी – माजी सैनिक संघटनेचे भाऊसाहेब रानमाळ, सुनील साळुंखे, गणेश जाधव, भाऊसाहेब आगवान, सुधीर करपे, दीपक लांडगे, हरिश्चंद्र खोसे, शिवाजी तोरडमल, रमेश तोरडमल, अरुण माने, श्रीकांत मारकड, चंद्रकांत परदेशी इत्यादी माजी सैनिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा