गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कर्जत मधील प्रभाग ६ मध्ये विकास कामाचे भूमिपूजन

कर्जत मधील प्रभाग ६ मध्ये विकास कामाचे भूमिपूजन

कर्जत, दि. ४ जून २०२०: कर्जत शहरातील प्रभाग ६ मधील नगरसेविका मोनाली ओंकार तोडे यांच्या विकास निधी मधून त्यांच्या प्रभागात सिमेंट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ झाला.

शहरातील प्रभाग ६ मधील काँग्रेस नगरसेविका मोनाली ओंकार तोडे यांनी प्रभागातील विकास कामावर सातत्याने पाच वर्षापासून झपाट्याने भर दिला आहे. प्रत्येक कामासाठी ते स्वतःच सातत्याने पाठपुरावा करून यश संपादन देखील करतात.

मोनाली यांच्या निधीतून प्रभाग ६ मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी हे काम सुरू केल्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका मोनाली तोडे यांना धन्यवाद दिले आहेत.

या वेळी नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, संतोष मेत्रे , नगरसेवक सचिन घुले, नगरसेविका मनिषा सोनमाली, रेखा कांबळे, युसूफ पठाण, यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version