कर्जत, दि. १४ जून २०२० : कर्जत येथील दि १३ जून रोजी दुचाकी व चारचाकी यांच्यात भीषण धडक होऊन दुचाकी एम एच १६ एक्स ३५६३ चा चालक जखमी झाला आहे. कर्जत कुळधरण रोड वरील बिंग वाशिंग सेंटर समोर चारचाकी एम एच १२ पी ३०२ ही कर्जत रोड कडे वळत असताना दुचाकी चालकाने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन चालक उंच उडून शेजारी असलेल्या खड्यात पडला या मुळे त्यास मुक्कामार लागला असून गुडघ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी गाडी चालकास तात्काळ दवाखान्यात दाखल केले. अपघात प्रसंगी रस्त्यावरील चारचाकी गाडी शर्तीचे प्रयत्न करून बाजूला काढली होती. दुचाकी चालक कर्जत कडून वेगाने चाललेला होता. अचानक चारचाकी वळत असताना त्याला दिसल्याने दुचाकी वाहन चालकास त्याच्या गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तो चारचाकीच्या पुढील बाजूला डाव्या चाका जवळ त्यांने जोरदार धडक दिली होती.
दुचाकी चालकाचे दैव बलवतर म्हणून त्यांचे प्राण वाचले. दोन चाकी वाहनाचे पुर्ण नुकसान झाले होते. पुढल्या चाकाची रिम वाकली होती.चार चाकी वाहनाचेही फार मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणताही प्राण हानी झाली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष