कर्जत, दि. ११ जून २०२०: कर्जत पंचायत समितीच्या नवा सुशोभकरणाचा पॅटर्न सभापती अश्विनी कानगुडे यांनी आखला आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या परिसरात वृक्षारोपण, लाॅन, फार्मल स्ट्याचू, प्रवेशद्वार सुशोभिकरण आदि कामे केली जाणार आहेत. बारामती येथील लाहस ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वैभव गोटे यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी याची सोमवारी पाहणी केली आहे.
लवकरच प्लान तयार करून हे काम हाती घेतले जाणार आहे अशी माहिती कर्जतच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी सांगितली. पंचायत समिती येथे तालुक्यातील लोकांसह अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा वावर पाहण्यास मिळत असतो.
कामानिमित्त आलेल्या नागरिकांना अनेकदा पंचायत समिती मध्ये थांबावे लागते. त्यांच्या साठी हि वाढीव सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे. या वेळी गटविकासाधिकारी अमोल जाधव, रूपचंद जगताप, आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष