पोलिसांच्या सतर्कतेमुळे कर्जत तालुका अद्याप कोरोना मुक्त

कर्जत, दि. १९ मे २०२०: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अद्याप एकही कोरोना चा रूग्ण सापडलेला नाही या सर्व कामगिरीचे श्रेय अहमदनगर व पुणे जिल्हा यांच्यातील संयुक्त कामगिरीला जाते.

सविस्तर वृत्त असे, अहमदनगर जिल्हा व पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे सिध्दटेक या ठिकाणी असलेल्या भीमा नदी वरील महत्वाचा पुल होय. या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील दळण वळण सुलभ होते.

काही दिवसांपूर्वी दौंड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे असे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे या चेकपोस्ट वर येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. ज्या नागरिकांनी पास काढलेला असेल त्यांनाच सोडले जात आहे.

पोलिस कर्मचारी त्यांचे कार्य अतिशय चोख पध्दतीने करत आहेत आणि त्यांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील वातावरणात आणि परिणामी कर्जत तालुक्यातील नागरिकांना कोरोना मुक्त ठेवण्यात सर्वात महत्वाचे दुवा ठरत आहेत.

चेकपोस्ट वर कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल ठोंबरे, पो.काॅ.मागंळे, वाघमारे होम गार्ड, गावडे पोलिस मित्र हे सर्व आपले कार्य अप्रतिम रित्या करत आहेत. पोलिस निरीक्षक गायकवाड आणि पोलिस उपनिरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा चेकपोस्ट कार्यरत आहे. ठोंबरे म्हणाले की गायकवाड साहेब आणि माने साहेब यांच्या सतर्कतेमुळे कर्जत मधील कोरोनाचे वातावरण हे शांत आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व तालुक्यातील पोलिस कर्मचारी वर्ग कोरोना विरोधात डोंगरकड्या सारखे उभे आहेत. ठोंबरे यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, लहान मुलांची काळजी घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही लक्षणे दिसल्यास गावातील आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा