कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न

कर्जत, दि. ११ जून २०२० : महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नेते ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी म्हणून ज्यांना पाहिले जात ओळखलं जातं असे नेते म्हणजे शरद पवार होय.

पवार यांनी १० जून १९९९ रोजी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षापासून वेगळे होऊन स्वतःचा एक नवीन पक्ष महाराष्ट्र मध्ये जन्माला घातला. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस होय.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला २१ वर्ष पुर्ण केले आहेत. महाराष्ट्र मध्ये महत्वाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीने वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज महाराष्ट्रातील राजकारण पवार यांच्या नावाशिवाय पुर्ण होत नाही.

राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसा निमित्ताने कर्जत येथे रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.या साठी कर्जत परिसरात पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वर प्रेम करणारे नेते कार्यकर्ते यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी , अधिकारी , नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा