चागंला रस्ता रात्री अचानक खोदल्यामुळे कर्जतकर संतप्त

7

कर्जत, दि. ३० मे २०२०: कर्जत मधील मुख्य रस्ता अचानक पणे रात्री खोदल्याने कर्जतकर संताप व्यक्त करत आहेत. कर्जत मधील मुख्य आणि महत्वाचा रस्ता केबल टाकण्यासाठी मध्य रात्री ठेकेदाराने अचानक खोदल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सविस्तर वृत्त असे की, काल रात्री कर्जत मधील मुख्य रस्ता अचानकपणे ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी खोदला. चागंला रस्ता खराब केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या अंधारात केलेल्या या गैरकृत्यस कोणाची परवानगी होती हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बांधकाम खात्यातून आणि महसूल विभाग व नगर पंचायतीने परवानगी दिलीच कशी, प्रांत तहसीलदार यांची परवानगी घेतलेली आहे का असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा