कर्जमुक्त पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्या: जिल्हाधिकारी

नाशिक, दि २७ मे २०२० : खरिप हंगामासाठी जिल्हयाला देण्यात आलेल्या पीककर्जाच्या उद्दिष्टापैकी अवघ्या ४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याने कृषीमंत्र्यांनी नाराजी दर्शवत जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बँकांची बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्याला खरीप हंगामासाठी ३३०० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १४०० शेतक-यांना अवघे ४१ कोटी रूपयांचेच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र खरिप हंगामाकरीता शेतकर्‍यांना कर्ज मिळणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर अधिकाधिक शेतकर्‍यांना पीककर्ज मिळावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

एकूणच कामकाज थंडावल्याने पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. या सर्वांचा परिणाम कर्ज वाटपावर झाला.

जोपर्यंत त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंंत त्यांना नविन पीक कर्ज देण्यात बँकांना अडचणी आहेत. थकित कर्जमाफीचा लाभ देवून त्यांची कर्ज खाते क्लियर करून त्यांना २०२० मध्ये खरिप पीक कर्ज घेण्यास पात्र करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा