कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही: इन्फोसिस

बंगळूर: मागील आठवड्यात इन्फोसिस मधील काही अज्ञात कर्मचाऱ्यांनी कंपनी आपल्या बॅलन्स शीट मध्ये चुकीचा नफा दाखवत असल्याची तक्रार केली होती. इन्फोसिसने काल या आरोपाचे खंडन करत कर्मचाऱ्यांनी ठेवलेला हा आरोप चुकीचा आहे व त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही असे राष्ट्रीय शेअर बाजाराकडे स्पष्ट केले आहे. मागील तिमाही निकालामध्ये कंपनीने आपला नफा बॅलन्स शीट मध्ये वाळवून दाखवल्याचे तक्रार या कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे केली होती.
इन्फोसिसने एन एस ई ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत कोणताही प्रथम दर्शनी ठोस पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे आरोपात कोणतेही तथ्य नाही. कंपनीची लेखा परीक्षा म्हणजेच ऑडिट समिती कायदेशीर सल्लागार यांसोबत या प्रकरणी आणखी तपास करत आहे. याशिवाय कंपनीने स्वतंत्र लेखा परीक्षक म्हणून अर्णेंस्ट अँड यंग या संस्थेची नियुक्ती केली असल्याची माहिती इन्फोसिसने एन एस इ ला दिली आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा