कर्नाटक, ३ ऑगस्ट २०२०: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. यासह, त्यांनी आपल्या संपर्कातील सर्व लोकांना सेल्फ क्वारंटाईन राहून चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘माझा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आला आहे. मी ठीक आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी केली पाहिजे आणि आतापासून स्वत: ला अलग ठेवण्यात यावे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ओल्ड एअरपोर्ट रोड येथील मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी त्यांनी राज्यपालांना भेट दिली होती.
अमित शहा यांना कोरोनाची लागण
याआधी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यांनी स्वत: ट्विटर हँडलवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मेदांताच्या १४ व्या मजल्यावरील खोली क्रमांक ४७१० मध्ये ठेवले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताना अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘कोरोनाची सुरुवातीची चिन्हे दिसू लागल्यानंतर माझी चाचणी झाली आणि अहवाल सकारात्मक आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्क आलेल्या सर्वांना विनंती आहे की, कृपया स्वतःला क्वारंटाईन करा आणि तुमची चाचणी करा.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे देखील रविवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. स्वतंत्र देव यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी