गोल पोस्ट स्पॉटलाइट कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं वेदा कृष्णमूर्तीला केलं फिल्मी स्टाईलने प्रपोज

कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं वेदा कृष्णमूर्तीला केलं फिल्मी स्टाईलने प्रपोज

पुणे, १४ सप्टेंबर २०२२ : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यावेळी भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरीही एका खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. भारताचे स्टार महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. वेदानं कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसलाशी साखरपुडा केल्याची सोशल मीडिया द्वारे माहिती दिली. वेदानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुनने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलाय. अर्जुनच्या प्रपोजला वेदा कृष्णमूर्ती हिने ही ग्रीन सिग्नल दिला आहे..

फोटोमध्ये स्पष्टपणे दिसते की, अर्जुन ने वेदाला प्रपोज केल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे .महिला संघातील इतर खेळाडूंनीही वेदा कृष्णमूर्तीच्या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केलेला आहे.

वेदा कृष्णमूर्ती ही भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज असून ती गोलंदाजी ही करते. तिने २०११ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केले.तिने भारतासाठी आत्तापर्यंत एकूण ४८, एकदिवसीय आणि ७६ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. वेदाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १९ अर्धशतक झळकावली आहेत. ७१ ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वेदाने २०२० मध्ये आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता.

दुसरीकडे अर्जुन ने कर्नाटक रणजी संघाकडून डिसेंबर २०१६ मध्ये पदार्पण केले होते. याशिवाय तू कर्नाटक प्रीमियर लीग के पी एल सह अनेक राज्यस्तरीय टी ट्वेंटी स्पर्धा खेळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version