कर्नाटक सरकार २२ जुलै पर्यंत करणार संपूर्ण कडक लॉकडाऊन

5

बेंगळूरू , १३ जुलै २०२० : कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे की लोकांनी या कोरोना साथीच्या रोगाला न घाबरण्याचे अवाहन केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ते पुढे म्हणाले की या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी पुढील दोन महिने आपल्या समोर मोठे आव्हाने येतील.

कोविड १९ ची एकूण रूग्ण संख्या ३६००० पेक्षा जास्त झाली आहे ज्यात ६१३ जणांचा मृत्यू आणि १४,७१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बंगळुरुमध्ये ही तीव्रता अधिक असल्याने राज्य सरकारने मंगळवारी संध्याकाळपासून २२ जुलै पर्यंत एका आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि जद (एस) नेते एच डी कुमारस्वामी यांनी बेंगळुरू शहरी आणि ग्रामीण जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनवर सरकारचे समर्थन केले आहे. केवळ आवश्यक सेवांच्या हालचालींना परवानगी देणा-या आंतरजिल्हा प्रवासालाही मर्यादित ठेवण्याची विनंती त्यांनी सरकारला केली

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा