गोल पोस्ट गुन्हा कर्नाटक : शिक्षकाने विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरुन फेकले; विद्यार्थ्याचा मृत्यू

कर्नाटक : शिक्षकाने विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरुन फेकले; विद्यार्थ्याचा मृत्यू

बेंगळुरू, २० डिसेंबर २०२२ कर्नाटकातील एका शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून, पहिल्या मजल्यावरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नरगुंड तालुक्यातील हदली गावात घडली. शिक्षक मुथप्पा हदगली याने भरत या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर, त्याने मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. या घटनेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी शिक्षक कंत्राटी कर्मचारी आहे.

दरम्यान, शिक्षकाकडून मुलाच्या आईलाही मारहाण करण्यात आली. यानंतर शिक्षक फरार झाला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाची आई याच शाळेत शिक्षिकाही आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचे कारण कौटुंबिक वाद असण्याचे सांगितले जात आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

यापूर्वी १६ डिसेंबर रोजी दिल्लीतील मॉडेल बस्ती प्राथमिक शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले होते. त्यानंतर आरोपी शिक्षकेला २० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version