गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोडला अटक, महिला मॉडेलने केले गंभीर आरोप

करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोडला अटक, महिला मॉडेलने केले गंभीर आरोप

मुंबई, २१ जानेवारी २०२३ : करणी सेनेचे नेते आणि अभिनेता सुरजित सिंह राठोड यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा विनयभंग आणि छळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मॉडेलने मुंबईतील बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये सुरजित सिंह राठोड यांच्या विरोधात गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरजित सिंह राठोड हे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुरजित सिंह राठोड चर्चेत आला होता, जेव्हा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरजित थेट अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version