गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा कार्तिक आर्यन झळकणार बायोपिकमध्ये

कार्तिक आर्यन झळकणार बायोपिकमध्ये

मुंबई : सध्या अभिनेता कार्तिक आर्यनसाठी २०१९ हे वर्ष लकी ठरले. या वर्षात कार्तिकचे ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छिपी’, ‘पति पत्नी और वो’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरले.
आगामी वर्षात अर्थात २०२० मध्येही त्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. त्यामध्ये, ‘लव आज कल २ ′, ‘दोस्ताना’ आणि ‘भूल भुलैया २′ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच तो एका बायॉपिकमध्ये देखील झळकणार आहे.
हा बायोपिक दिवंगत पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती इम्तियाज अली करणार असून याचे दिग्दर्शन इम्तियाजचा भाउ साजिद अली करणार आहेत. दरम्यान, या बायोपिकमध्ये कार्तिकसोबत आणखी कोण झळकणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे २०२० हे वर्षही कार्तिकसाठी लकी ठरणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version