करूणने दिला बूमराहला धक्का; रोहित म्हणाला तु बूमराहशी..,प्रतिक्रिया व्हायरल.!

Jasprit Bumrah and Krun Nayar Fight IPL 2025
करूणने दिला बूमराहला धक्का; रोहित म्हणाला तु बूमराहशी..,प्रतिक्रिया व्हायरल.

Jasprit Bumrah and Krun Nayar Fight IPL 2025 :आयपीएल सुरू आहे म्हणजे शिल्लक शिल्लक कारणावरून वाद होणारच असच काल दिल्ली विरुद्ध मुंबईच्या सामन्यात पहायला मिळल. मुंबई इंडियने दिल्ली कपिटल्सचा घरच्या मैदानावर १२ धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमात दुसरा विजय मिळवला. जो मुंबई संघाच्या दृष्टीकोणातून खूप महत्वाचा होता. दिल्ली कपिटल्सकडून करुण नायरने ८९ धावांची आक्रमक आणि वादळी खेळी केली. त्याच्या या खेळी दरम्यान त्याने जसप्रीत बूमराहच्या गोलंदाजीवर विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली. मात्र त्यानंतर नॉन स्ट्राइकला २ धावा घेताना करूण आणि बूमराहमध्ये वाद झाला.

मुंबईने २० षटकांत २०६ धावांचे लक्ष दिल्ली समोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटलचा संघ १९ षटकांत १९३ धावांवर सर्वबाद झाला. दिल्लीचा यंदाच्या हंगामात पहिलाच पराभव असून सामन्या दरम्यान वाद देखील पहायला मिळाला. ज्यावेळी मैदानात बूमराह आणि करुण नायरचा वाद झाला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने दोघांत हस्तक्षेप करून वाद मिटवला.

जसप्रीत बूमराहच्या सहाव्या षटकांत करूण नायरने २ षटकार आणि १ चौकार लगावत वादळी फलंदाजी केली. अखेरच्या चेंडूवर २ धावा घेत २२ चेंडूत आपल अर्धशतक पूर्ण केल. इथे दुसरा धावा घेताना त्यान बूमराहला चुकून धक्का दिला. यानंतर करुणने बूमराहला हात दाखवला. त्यानंतर टाईम आउट झाला. या टाईम आऊट दरम्यान बूमराह दिल्लीच्या खेळाडूंच्या घोळक्यात जाऊन करूणला काहीतरी बोलून माघारी परतला. पण फिल्डिंग करत असलेला रोहित शर्मा मात्र हसत हसत त्याची फिरकी घेताना दिसला. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर