कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक : राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२३ :कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज ठाकरे यांनी आज, रविवारी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

  • काय म्हणाले राज ठाकरे ?

अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपने जो उमदेपणा दाखवला तोच आता महविकास आघाडीने दाखवावा. ही राज्याची प्रगल्भ संस्कृती देशाला दाखवण्याची संधी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा