काश्मीरमध्ये पोस्टपेड सेवा सुरू

22
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर 68 दिवस बंद असलेली मोबाईल सेवा अखेर घाटीत सुरू.
 घाटीतील पर्यटकांवरील बंदी काढून टाकल्यानंतर पोस्टपेड सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 माहितीनुसार, पोस्टपेड नंतर प्रीपेड मोबाइल सेवा देखील सुरू केली जाणार आहे.
 तसेच घाटीत इंटरनेट सेवा सुरू होण्याकरता स्थानिकांना काही काळ अजून वाट पाहावी लागणार आहे.
 घाटीत 66 लाख मोबाईल ग्राहक, त्यामध्ये जवळपास 40 लाख लोकांकडे पोस्टपेड मोबाइल सुविधा आहे.