काश्मीरला नव वर्षाची भेट, मोबाइल व ब्रॉडबँड सेवा सुरू

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मिरला नवीन वर्षाची भेट देऊन सरकारी रुग्णालयांमध्ये मोबाइल व ब्रॉडबँड सेवेवरील एसएमएस सेवा पूर्ववत केली आहे. आता काश्मीरमधील लोक त्यांच्या मोबाइलवरुन त्यांच्या नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश पाठवू शकतील. मंगळवारी संध्याकाळी राज्य सरकारचे प्रवक्ते आणि नियोजन विभागाचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी ही घोषणा केली. दरम्यान, राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे गोष्टी सामान्य होत आहेत, त्यावरून लवकरच मोबाइल इंटरनेट सेवाही पूर्ववत होईल.

जम्मू-काश्मीरला नववर्षाची भेट मिळाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमधील सर्व परिसरात एसएमएस सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटलमधील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर यात थोडी-थोडी सवलत देत ही सेवा सुरू करण्यात येत होती. परंतु, सर्वात आधी लँडलाइन सेवा सुरू केली. त्यानंतर पोस्टपेड मोबाइलच्या फोनची सेवा सुरू केली. सर्वात शेवटी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा