काश्मीरमध्ये ताज्या बर्फवृष्टीमुळे लष्कराच्या ४ जवानांसह ६ ठार

काश्मीर: काश्मीरमध्ये हिमवृष्टी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्कराच्या दोन जवानांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी रात्री कुपवाडा येथील लंगाटे भागात लष्कराच्या एका वाहनाला अपघात झाला जोरदार हिमवृष्टीमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे हा अपघात झाला.
तसेच, जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश कुपवाडा जिल्ह्यात दोन सैन्य दलाचे सैनिक आणि दोन नागरिक बर्फात अडकून पडल्यामुळे ठार झाले. प्रदेशात हिवाळा सुरू झाल्यानंतर ही पहिली बर्फवृष्टी आहे. पीर पंजाल पर्वताच्या उंच भागात बर्फवृष्टी झाल्यावर राजौरी मधील मोगल रोड बंद करण्यात आला. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या हवामानामुळे श्रीनगर आणि लेह विमानतळांवर जाणार्‍या वेगवेगळ्या खासगी विमान कंपन्यांची 11 उड्डाणे शुक्रवारी रद्द करण्यात आली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा