काश्मीरमधील हिमवृष्टीमुळे सफरचंदाची आवक ठप्प

कश्मिर: काश्मीरमधील श्रीनगर, पुलगाम, अनंतनाग, सोपोर, बारामुल्ला या जिल्ह्य़ात सफरचंदाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या पाच जिल्ह्य़ांतून संपूर्ण देशात सफरचंद विक्रीसाठी पाठविली जातात. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे येथील जीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीरमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. श्रीनगर ते जम्मू या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहने सोडली जात आहेत. जम्मूला जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य साहित्य श्रीनगरहून पाठविले जाते. या सर्वांचा परिणाम यंदा सफरचंदाच्या विक्रीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. देशभरात सफरचंदाची होणारी आवक यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात महिनाभर आधीच काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू झाल्यामुळे तेथून संपूर्ण देशात होणारी सफरचंदांची आवक जवळपास ठप्प झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने सफरचंदाच्या दरातही वाढ होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा