कसोटीत न्युझीलंडचा पराभव, मात्र टेलरचा विक्रम

19

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे ३ टेस्ट मॅचची ही सीरिज न्यूझीलंडने ३-० अशी गमावली आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी रॉस टेलरने मात्र खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रॉस टेलर हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे.

सिडनी टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी नॅथन लायनच्या बॉलिंगवर टेलरने ३ रन काढून स्टीफन फ्लेमिंगचा विक्रम मो़डीत काढला. ३५ वर्षांच्या टेलरने ९९ टेस्ट मॅचमध्ये ४६.२८ च्या सरासरीने ७,१७४ रन केले आहेत. यामध्ये १९ शतकं आणि ३३ अर्धशतकं आहेत.

फ्लेमिंगने १९९४ ते २००८ या कालावधीमध्ये १११ टेस्ट मॅचमध्ये ७,१७२ रन केले. टेलरला या सीरिजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. याआधी झालेल्या मेलबर्न टेस्टमध्येच टेलरला हा विक्रम करता आला असता, पण त्याला फक्त ६ रनच करता आल्या. मागच्या ६ इनिंगमध्ये टेलरला ८०, २२, ४, २, २२ आणि २२ रनच करता आल्या.

टेलरने मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडचा सर्वाधिक वनडे रन करण्याचा विक्रमही केला होता. टेलरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक रन आहेत. टेलरने सिडनी टेस्टमध्ये १७,२५० रनचा आकडा पार केला, यामध्ये ३९ शतकं आणि ८८ अर्धशतकं आहेत.

सिडनी टेस्टमध्ये न्यूझीलंडची टीम ४१६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती. पण १३६ रनवरच किवींचा ऑल आऊट झाला. आणि त्यांना २७९ रणांनी पराभव स्वीकारावा लागला. याआधी न्यूझीलंडला पर्थ आणि मेलबर्नमध्येही पराभवाचा धक्का लागला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा