पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सर्व पारंपरिक पूजा विधी करीत भाविक व भक्तांविना काटे बारस संपन्न

पुरंदर दि.२६ नोव्हेंबर २०२० :  पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील प्रसिद्ध काटे बारस यात्रा आज मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.आज यात्रा काळात मंदिरासमोर गर्दी करण्यास पोलिसांनी निर्बंध घातले होते. त्यामुळे लोकांनी घरी राहूनच काटे बरसीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.आज पहाटे पासून होणारे सर्व नियमित विधी परंपरेप्रमाणे पार पडले.शेवटी मंदिरासमोर काट्यांचा ढीग पेटवून या यात्रेची सांगता करण्यात आली.

गुळुंचे येथील ज्योतिर्लिंगाची यात्रा ही काटेबरास यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी मंदिरासमोरील बाभळीच्या काट्यांच्या ढिगऱ्यात भक्त गण उघड्या अंगाने उड्या घेत असतात. हा रोमांचकारी क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्यातील अनेक भागातून लोक या ठिकाणी गर्दी करीत असतात. त्यामूळे मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. यात्रा काळात जवळपास एक लाख लोक या देवस्थानाला भेट देत असतात.या वर्षी कोरोना असल्याने प्रशासनाने गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच गर्दी झाल्यास कारवाईचे संकेत दिले होते. त्यामूळे आज असणाऱ्या सर्वच कार्यक्रमाला मोजक्याच लोकांनी हजेरी लावली.

सकाळी दंडवताचा कार्यक्रम पोलिसांच्या सूचनेनुसार फेरबदल करून फक्त नमस्कारावरच आटोपण्यात आला. दुपारी साडे बारा वाजता होणारी बहिण भाऊ भेट सकाळी लवकरच म्हणजे साडे दहा वाजता अत्यंत कमी लोकात आटोपण्यात आली. केवळ ढोल व ताशा या वाद्यांच्या साथीने देव भेटीसाठी गेले.यानंतर देवाची पालखी व काठी मंदिरात आणण्यात आली. पारंपरिक पद्धतीने काट्यांच्या ढिगाऱ्याला पालखी व काठीची प्रदक्षिणा झाली. मानकऱ्यांच्या हस्ते सर्व विधि करीत, सर्व कार्यक्रम मोजक्याच लोकांमध्ये पार पडले.शेवटी आंगाऱ्यासाठी या कट्याचा ढीग जाळण्यात आल्या.

यावेळी गर्दी होऊ नये म्हणून जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, नंदकुमार सोनलकर दोन महिला व दहा पुरुष कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . यावेळी नीरा येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी गणेश जाधव त्यांचे यांनी आरोग्य सेवा बजाज.या प्रसंगी तलाठी महाजन, गुळुंचेचे पोलीस पाटील दीपक जाधव कर्नलवाडीचे पोलीस पाटील, दिनेश खोमणे गुळूंचेचे ग्रामसेवक जयंद्र सुळ,सरपंच विजय कुंभार.माजी उपसरपंच संतोष निगडे, कर्नल वाडीचे सरपंच सुधीर निगडे,माजी उपसरपंच भरत निगडे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतीनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा