कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुळूंचे येथील काटेबासरीचा मुख्य कार्यक्रम रद्द

नीरा (पुरंदर), २४ नोव्हेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गुळूंचे येथील काटेबारस यात्रेत होणाऱ्या प्रमुख आकर्षण असलेल्या कटेमोडवणास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सक्त मनाई केलीय. नित्य नियमानं होणाऱ्या पूजा विधी व नीरा नीरा नदीवरील स्नान इत्यादी मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखत पार पाडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, गर्दी होणाऱ्या कोणताही कार्यक्रम घेण्यास त्यांनी मनाई केलीय.

गुळूंचे येथे ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांची येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाच्या काटेबारस यात्रेच्या निमित्तानं एका संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये यात्रे दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती महाडिक यांनी घेतली. यावेळी पोलीस उपनरीक्षक विजय वाघमारे, गुळूंचेचे सरपंच संभाजी कुंभार, उपसरपंच संतोष निगडे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना महाडिक म्हणाले की, या यात्रेवर पोलिसांचे गुप्तचर विभाग मार्फत लक्ष असणार आहे. कोरोनाची दुसरी लाठ येत असताना आपण कोणताही अताताई पणा करणं धोक्याचं आहे. आपल्या परंपरा जपणं जरी महत्त्वाचं असलं तरी लोकांचं जीवनही त्या पेक्षा जास्त महत्वाचं आहे.

त्यामूळं कोणत्याही गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रशासनाची परवानगी असणार नाही. असे कार्यक्रम झाले तर यात्रा कमिटी स जबाबदार धरले जाईल. यात्रा काळात कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं. जे लोक नियमाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. यावेळी कर्नल वाडीचे माजी उपसरपंच भरत निगडे यांनी पोलीस प्रशासनाचे आभर मानले.

नैमित्तिक विधी थोड्या लोकांमध्ये होणार

कटेमोडवान या प्रमुख व गर्दी होणाऱ्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी यात्रे निमित्त होणाऱ्या नियमित पूजा विधीला मात्र पोलिसांनी हिरवा कंदील दाखवलाय. यामध्ये मंदिरात होणारे विधी, नीरा नदीवरील स्नान, पालखीची ग्राम प्रदक्षिणा, बहिण भाऊ भेट, इत्यादी कार्यक्रम १५ ते २० लोकांमध्ये सामाजिक अंतर राखत पार पाडण्यास पोलिसांची हरकत असणार नाही. मात्र, बाहेर गावच्या लोकांना या मध्ये सहभागी होता येणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा