कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ची रिलीज डेट झाली जाहीर

मुंबई, १८ जुलै २०२३ : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच साऊथ स्टार विजय सेतुपतीसोबत ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मेरी ख्रिसमस १५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात राधिका आपटेही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

रमेश तौरानी, जया तौरानी, संजय रौत्रे आणि केवल गर्ग निर्मित ‘मेरी ख्रिसमस’ वेगळ्या कलाकारांसह हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित होईल. हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्या भूमिका आहेत, तर तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षण्मुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्याही भूमिका आहेत. अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा