काय आहे कॅब आणि एनआरसी ?

सध्या कॅब आणि एनआरसी म्हणजे काय ? दोघांचा अर्थ काय आणि वाद का होत आहेत. या प्रश्नाला समजून घेण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी इतिहास माहिती करून घेणं आवश्यक आहे. मुळात भारतीय नागरिक कोणाला म्हणावे यात अनेक घटकांची वेगवेगळी मते स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आली आहेत. मात्र भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले. तेच मुळात धर्माधारित फाळणीसह प्राप्त झाले. मुस्लिमबहुल पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) भारतापासून वेगळे झाले. भारत स्वतंत्र होईपर्यंत येथील सर्व स्थायिक हे “ब्रिटिश सब्जेक्ट्स”  म्हणजे “ब्रिटिशांची प्रजा” होते.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा दोन प्रकारचे स्थायिक निर्माण झाले. भारतीय संस्थाने वगळता, उर्वरित ब्रिटिश इंडियातील लोकांना अजूनही ब्रिटिश प्रजा सब्जेक्ट्स म्हटले गेले, तर भारतीय संस्थानांमधील स्थानिक नागरिकांना भारतीय प्रजा संबोधले गेले. १९५०मध्ये जेव्हा भारतीय घटना अमलांत आली. तेव्हा भारतीय “नागरिकत्व” सुरू झाले. सर्वप्रथम फाळणीनंतर भारतात आलेले आणि २६ जानेवारी १९५०पर्यंत भारतात कायम वास्तव्य असणाऱ्यांना नागरिकत्व देण्यात आले. जी ब्रिटिश प्रजा भारतीय आहे, व इथेच स्थायिक आहे त्यांनाही भारतीय नागरिकत्व मिळाले.
२६ जानेवारी १९५० या तारखेनंतर जन्मलेल्यांना सुरुवातीला दोन प्रकारे भारतीय नागरिकत्व शक्य होतं- सिटीझनशीप बाय बर्थ आणि सिटीझनशीप बाय डिसेन्डन्ट्स. तुमचा जन्म २६ जानेवारी १९५० नंतर भारतात झाला असेल तर तुम्हाला आपोआप नागरिकत्व मिळे. तुमचा जन्म त्यापूर्वी असेल पण त्या तारखेनंतर तुम्ही भारतात स्थायिक होऊ इच्छीत असाल, तर तुमचे वडील भारतीय असणे अनिवार्य होते.
१० डिसेंबर १९९२ नंतर नागरिकत्व कायद्यात बदल झाला आणि केवळ जन्म भारतात झाल्याने भारतीय नागरिकत्व न देता, दोन्ही पालकांपैकी किमान एक पालक भारतीय नागरिक असेल आणि अपत्याचा जन्म भारतात झाला असेल तरच त्या अपत्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकेल असे मान्य केले गेले.

या व्यतिरिक्त १९५५ मध्ये आणखी एका प्रकारे नागरिकत्व मिळण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती केली गेली होती. तो प्रकार म्हणजे ‘सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशन’ – नोंदणीकृत नागरिकत्व. यात पुढील व्यक्तींना केंद्र सरकारने नागरिकत्व देण्यास मंजुरी देण्याची तरतूद होती:

◆भारतीय मूलनिवासी (a person of Indian origin) जो भारतात ७ वर्षे अधिकृतरीत्या राहात आहे. (यात आणखी काही उपकलमे/अटी आहेत)

◆भारतीय मूलनिवासी ज्याने भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे आणि ती व्यक्ती भारतात किमान ७ वर्षे रहात आहे.

◆ भारतीय नागरिकांची लहान (मायनर) अपत्ये (भारतात जन्मलेली असोत/नसोत)

◆१८ वर्षावरील (भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्ती) व्यक्ती ज्यांचे पालक भारतीय नागरिक आहेत.

◆ १८ वर्षावरील (भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्ती) व्यक्तीचा किमान एक पालक परतंत्र भारताचे नागरिक होते आणि ती व्यक्ती सलग १ वर्ष भारतात रहात आहे.

◆१८ वर्षावरील (भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्ती) व्यक्ती जी किमान पाच वर्षे ओवरसीज सिटिझन आहे आणि गेले सलग १ वर्षे भारतात रहात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा