काय आहे कम्‍युनिटी ट्रांसमिशन

पुणे, दि. ९ जून २०२०: कोविड -१९ चा प्रादुर्भाव वाढण्याच्या तिसऱ्या टप्प्याला कम्‍युनिटी ट्रांसमिशन असे म्हटले जाते. संक्रमण वाढण्याचा हा टप्पा तेव्हा येतो जेव्हा एकाच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्गित रुग्ण आढळून येतात. इतर ठिकाणांच्या तुलनेत अशा ठिकाणी सर्वात जास्त प्रकरणे पाहण्यास मिळतात.

कम्‍युनिटी ट्रांसमिशन मध्ये अशा व्यक्तीला देखील लागण होऊ शकते जी व्यक्ती कोरोना बाधित देशांतून आलेला नाही किंवा इतर कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली नाही. काही देशांमध्ये झालेल्या अध्ययनानुसार कम्युनिटी स्प्रेड झाल्यानंतर यापासून बचाव करणे अशक्य आहे. कोणत्या व्यक्तीला कोठून संसर्ग झाला हे देखील ओळखणे अत्यंत कठीण मानले जाते.

मार्चपर्यंत देशातील कोरोना विषाणू दुसर्‍या टप्प्यापर्यंत म्हणजेच स्थानिक संक्रमणाच्या (लोकल ट्रांसमिशन) अवस्थेपर्यंत होता. लोकल ट्रांसमिशन म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती कोविड -१९ बाधित देशांमधून भारतात येतो व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कोविड -१९ चा संसर्ग होतो. म्हणजे यामध्ये निश्‍चितपणे सांगता येऊ शकते की संसर्ग कोणाकडून कोणाकडे संसर्गित झाला आहे.

याचा फायदा असा आहे की संसर्गित व्यक्ती कोणाच्या संबंधात आली व त्यामुळे कोणाला प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखणे सोपे जाते. त्याच्याही आधी येतो पहिला स्तर ज्यामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये संसर्ग हा प्रसारित होत असतो. परंतु या सर्वांमध्ये अतिशय धोकादायक मानला जातो तो चौथा स्तर.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा