काय म्हणाले आज नरेंद्र मोदी.

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-ग्राम स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. याशिवाय स्वामित्व योजनाही सुरू केली आहे. या ई-ग्राम स्वराज वेबपोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंतायतीच्या सर्व योजनांची माहिती मिळणार असून, ग्राम पंचायतीच्या सर्व समस्यांची माहितीही या पोर्टलद्वारे मिळणार आहे.

करोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या समस्यांनी आपल्याला खुप काही शिकवलं. यामुळे आपल्याला स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश मिळाला असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कोरोनाच्या या संकटामुळे सर्वांचीच काम करण्याची पद्धत बदलली आहे. आता आम्ही एकमेकांना भेटून बोलू शकत नाही. पंचायत राजदिन हा दिवस स्वराज्य गावापर्यंत पोहोचविण्याची एक संधी आहे, असे मोदी म्हणाले.

“कोरोनाचे मोठे संकट आले, महामारी आली. या दोन-तीन महिन्यात आपल्या देशाने मर्यादीत संसाधने असतानाही अडचणीसमोर झुकण्याऐवजी दोन हात केले. अडचणी येत आहेत. संकल्पाचे सामर्थ्य दाखवत नवीन ऊर्जेसह देशाला पुढे नेण्याचे काम निरतंर सुरु आहे , असेहीे मोदी म्हणाले. कोरोनाच्या या संकटकाळात गावातील लोकांनी संपूर्ण जगाला मोठा संदेश दिला आहे आणि तो म्हणजे ‘दो गज की दुरी’ .

स्वामित्व योजना:

स्वामित्व योजना सुरू करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागामध्ये संपत्ती विषयी काय स्थिती आहे ते आपण जाणून आहात या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी हि स्वामित्व योजना काम करेल. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व भागांची ड्रोन च्या सहाय्याने मोजमापणी केली जाईल. जमिनीच्या सीमा निर्धारित झाल्यावर त्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मालकीहक्क दिला जाईल. याचा अर्थ असा झाला की स्वामित्व योजनेच्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील संपत्ती वरून होणारे भांडणे व वाद संपतील आणि विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यास मदत होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा