आज पासून सुरू होणार केबीसी, घर बसल्या तुम्ही घेऊ शकता भाग…

मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: टीव्ही स्क्रीनचा सर्वात लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ चा १२ वा सीझन सुरू होणार आहे. २८ सप्टेंबर म्हणजे आजपासूनच चित्रपट जगातील सुपरस्टार अमिताभ बच्चन तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर दिसतील आणि हॉट सीटवर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारतील. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं लोकं देतील तेवढी रक्कम देखील ते आपल्या सोबत नेतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही केबीसी’च्या हॉटसीट पर्यंत पोहोचला नसला तरी घरबसल्या देखील तुम्ही या खेळामध्ये सहभागी होऊ शकता व बक्षीस देखील जिंकू शकता.

वास्तविक, सोनी लाईव्ह’नंं केबीसी प्ले अलॉन्ग मध्ये दररोज १० लोकांना लखपती बनवण्यासाठी या खेळाचं आयोजन केलं आहे. यात आपण सोनी लाइव्ह ॲप च्या माध्यमातून या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि दररोज १० विजेत्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. यावेळी खास गोष्ट अशी आहे की, आपण एकट्याऐवजी संघ बनवूनही खेळू शकता, यासाठी आपण आपल्या मित्र, कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करून स्वत: ची टीम तयार करू शकता. यामध्ये संघातील सर्व सदस्यांची गुणसंख्या ही संघाची एकूण गुणसंख्या असेल. यावेळी दररोज एक संघ विजयी म्हणून निवडला जाईल आणि त्यांना एक लाख रुपये दिले जातील.

याच बरोबर वापरकर्ता इतरांना या खेळामध्ये इन्व्हाईट करून किंवा सजेशन करून देखील गुण कमवू शकतो. जेणेकरून त्यांना सोनी लाईव्हची सदस्यता विनामूल्य मिळू शकेल. तसेच, विजेत्या लोकांना कार, टीव्ही, मोबाइल फोन आणि ब्लूटूथ स्पीकर्ससह अनेक गिफ्ट कार्ड देखील मिळतील. हा कार्यक्रम सोमवारी रात्री ९ वाजता सुरू होताच आपण खेळण्यास सुरूवात करू शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा