गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक केसीआर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

केसीआर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

पंढरपूर २७ जून २०२३: तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश होणार आहे. यानिमित्त केसीआर हे आपल्या मंत्री, खासदार, आमदार,अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह सोमवारपासून दोन दिवसीय सोलापूर शहर-जिल्हा दौर्‍यावर आहेत.

केसीआर हे काल दुपारी चारच्या सुमारास हैदराबादहून सुमारे ३०० गाड्यांचा ताफा शक्तिप्रदर्शन करीत सोलापूरात दाखल झाले. काल कार्यकर्त्यांकडून सोलापूरात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत झाले. आज केसीआर यांनी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. यानंतर तालुक्यातील भगीरथ भालके यांच्या सरकोली गावी त्यांची जाहीर सभा होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version