गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सुरक्षित अंतर ठेवणे हाच कोरोनावर उपाय: बाळासाहेब पाटील

सुरक्षित अंतर ठेवणे हाच कोरोनावर उपाय: बाळासाहेब पाटील

सातारा, दि. ११ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांमुळे बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हे नागरिक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे. अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

कोरोना संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

कोरोनाचा कराड मध्ये प्रादुर्भाव वाढत आहे, ही प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, या आजारावर खात्रीशीर असे औषध नाही, सुरक्षित अंतर ठेवणे हाच यावर उपाय आहे.

मुंबई-पुण्याहून आलेल्या नागरिकांची संख्या प्रशासनाकडे आहे. पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. तसेच परराज्यातील नागरिकांची नोंदणी सुरु असून राज्यांनी होकार दिल्यानंतर रेल्वेही सोडण्यात येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version