केजरीवाल सरकार शेतकऱ्यांसाठी लावणार फ्री वाय-फाय हॉटस्पॉट

नवी दिल्ली, ३० डिसेंबर २०२०: केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. यादरम्यान वीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सिंघू सीमेवर शेतकरी कडाक्याच्या थंडीत आपले आंदोलन करीत आहे. या शेतकऱ्यांसाठी केजरीवाल सरकारने एक मोठी घोषणा केले आहे. दिल्लीत आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांसाठी केजरीवाल सरकार ठीक ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट उपलब्ध करून देणार आहे. आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

राघव चड्ढा म्हणाले की, . “खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला”, अशी माहिती राघव चड्ढा यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, “फ्री वाय-फाय सेवा आंदोनकर्त्या शेतकऱ्यांना केवळ कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंगच नव्हे तर भाजपाच्या खोट्या प्रचाराला देण्यासाठीही फायदेशीर ठरेल”. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा