नवी दिल्ली,१२ नोव्हेंबर २०२२ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात चंद्रशेकरचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. ही माहिती त्यांच्या वकीलांनी दिली, चंद्रशेकर यांनी पत्रात माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीची असल्याचे लिहिले आहे.
मी माझ्या स्वतःच्या पॉलीग्राफी चाचणीला सहमती दिली आहे. अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचीही तयारी असेल तर पॉलीग्राफी चाचणी करावी. चंद्रशेकर यांनी आणखी एक आरोप केला आहे. की केजरीवाल आणि जैन यांच्यासाठी करोडो रुपयांची घड्याळे खरेदी केल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेकर हे आम आदमी पार्टीवर आरोप करत आहेत.
मी केलेल्या आरोपांचे पुरावे देखील देण्यास तयार आहे. आधी संपूर्ण पैसे अमेरिकन खात्यात टाकण्यास सांगितले होते. पण नंतर जैन यांनी संपूर्ण पैसे रोख देतो असे सांगितले. त्यांनी माझ्याकडून पैसे व्हाईट केले असल्याचे चंद्रशेकर यांनी सांगितले आहे. जर केजरीवाल आणि जैन बरोबर असतील तर तुम्हाला पॉलीग्राफी चाचणी करण्यात काही अडचण नसावी असे चंद्रशेकर यांनी पत्रात म्हंटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर