लैंगिक संबंधास दिला नकार म्हणून केली हत्या

ठाणे, ३ मार्च २०२१: महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका नोकराने आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली. त्या नोकराला त्या महिलेबरोबर लैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करत होता.पण महिलेने ही गोष्ट करण्यास साफ नकार दिला आणि आपल्या नवर्याला सांगेल ही धमकी दिली.त्यानंतर मात्र नोकर या गोष्टी वर नाराज झाला.आणि आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली.

ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधे घडली आहे.जिथे मानपाडा पोलिसांनी २० वर्षीय आरोपीला अटक केली असून आरोपीचे नाव गुड्डू कुमार उर्फ ​​रंजन आहे. आरोपी डोंबिवली मधे एका किराणा दुकानात काम करत होता. रविवारी दुकानाच्या मालकाने त्याला जेवण्यासाठी घरी बोलावले होते. आरोपी रंजन, दुकान मालक आणि त्याची बायको जेवणा आधी ड्रिंक्स घेतली आणि गप्पागोष्टी करु लागले.

हे सर्व चालू असताना अचानक दुकान मालकाला एक काॅल आला आणि तो फोनवर बोलण्यासाठी घराबाहेर गेला. तो घराबाहेर जाताच संधीचा फायदा ़घेत रंजन ने त्याच्या बायको कडे शरीर सुखाची मागणी केली. आणि तिच्यावर दबाव आणू लागला. ज्या नंतर महिलेचा राग अनावर झाला आणि तिने रंजनली ओरडत धमकी की ती गोष्ट तिच्या नवर्याला सांगेल.

महिलेची हि धमकी ऐकून की आरोपी रंजन घाबरला आणि त्याने एका धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला केला. आणि चाकू भोसकून तिची हत्या केली या घटनेनंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला. थोड्या वेळाने दुकान मालक घरी आल्यानंतर पाहीले की बायको ही रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे. त्याने क्षणाचा विलंब न करता तिला घेऊन थेट रुग्णालय गाठले पण, तोपर्यंत महिलेने प्राण सोडले होते, असे डाॅक्टरांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा