गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई केईएम रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

केईएम रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

मुंबई : मुंबई येथील केईएम रुग्णायातील एका डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारणअद्यापही समजले नाही. प्रणय जयस्वाल असे डॉक्टरचे नाव आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आत्महत्येचे कारण समजू शकेल. असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवार (ता.१५) मध्यरात्रीपासून केईएममधील शल्य चिकित्सा करणारे डॉक्टर प्रणय जैसवाल (वय २९) आपल्या रुममध्ये आले नव्हते. त्यांच्या सोबत राहणाऱ्या डॉक्टरांनी रात्री ते येण्याची वाट बघितली.
मात्र, रात्री ते रूममध्ये न आल्याने सकाळी रुग्णालय प्रशासनला याबदल माहिती दिली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version