नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट दिले आहे. आज झालेल्या केंद्रीय बैठकीत रब्बी पिकांच्या हमीभावात ८५ रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
या हमीभावानुसार गव्हाला १८४०रुपयांनी वाढून १९२५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. याशिवाय ज्वारी १४४० रुपये वाढ १५२५ रुपये, मोहरी ४२०० वाढ ४४२५, तूर ४६२० वाढ ४८७५, करडई ४९४५ वाढ ५२१५, मसूर ४४७५ वाढ४८०० अशी हमीभावात वाढ करण्यात आली आहे.
याशिवाय एमटीएनएलचे बीएसेनेलमध्ये विलीनीकरण होणार असून या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना लागू करण्यात आली आहे. यांसह आदी निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.