कोझिकोड, ए.एन.आय: केरळमधील कोझिकोडमध्ये एका कुटुंबातील ६ सदस्यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपींना ६ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. ज्युडिशियल फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट कोर्टा, थमारसेरी यांनी आज हा निकाल दिला.
मालमत्तेशी संबंधित प्रकरण
हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे . या प्रकरणात नवऱ्या सह सासू आणि अन्य चार सदस्यांचा मृत्यू झाला होता . खुनासाठी सायनाईडचा वापरला केला गेला होता . या प्रकरणातील मुख्य आरोपी कुटुंबाची सून जॉली आणि तिचे दोन साथीदार यांना पोलिसांनी अटक केले आहे .
सायनाईड भोजनातून देण्यात आले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ वर्षांत जॉलीने अन्नाद्वारे घरच्या लोंकाना सायनाईड दिले आणि ६ लोकांचा बळी घेतला. जॉलीनेही आपला गुन्हा कबूल केला आहे. जॉली बरोबर तिचे दोन साथीदार एम एस मॅथ्यू आणि प्रजी कुमार यांनी तिला सायनाईड पुरविला.
पहिला खून२००२ मध्ये झाला होता
जॉलीने २००२ मध्ये पहिला खून सासू, अनम्माची केलीआणि त्याच वर्षी सासरे टॉम थॉमसला हि मारले होते. २०११ मध्ये पती रॉय थॉमसचा २०१४ मध्ये चुलते मॅथ्यू मनचडी आणि २०१६ मध्ये चुलतभाऊ शाजूची पत्नी सिलीआणि त्याच वेळी भाची अल्पाईन २०१६ मध्ये मारले .
आधी सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते
ही सर्व मृत्यूची घटना नैसर्गिक मानली जात होती. पण पोलिसांच्या तपासाने सर्वांना चकित केले. पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा जॉलीने मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संशयाची सुई तिच्याकडे गेली. संशय आल्यानंतर या पुरलेल्या मृतदेहांना बाहेर काढून तपासणी करण्यात आली. या सर्वांचा मृत्यू सायनाइडमुळे झाल्याचे तपासात समोर आले.
picture quality not good