केरळ राज्याचे नाव बदलेले, नव्या नावांचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

केरळ, ९ ऑगस्ट २०२३ : केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याचा ठराव आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या संदर्भातील ठराव मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडला. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करावे, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.

केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करावे, असा ठराव काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ने कोणत्याही सुधारणा किंवा बदल न सुचवता स्वीकारला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष एन.एन. शमसीर यांनी आवाजी मताने विधानसभेने एकमताने हा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

राज्याचे नाव बदलाचा ठराव मांडतांना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्याला मल्याळम भाषेमध्ये ‘केरळम’ असे म्हटले जाते. तर इतर भाषेमध्ये केरळ असे संबोधित करतात. मल्याळम भाषिक समुदायांसाठी संयुक्त केरळमची गरज राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून प्रकर्षांने निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळचे नाव नमूद करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा